सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाला कधी पाहिलंय का? मंजिरीने शेअर केले फॅमिली पिकनिकचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 05:36 PM2024-06-24T17:36:00+5:302024-06-24T17:42:42+5:30

Subodh bhave: सुबोधची मोठी फॅमिली असून ते एकमेकांसोबत सध्या निवांत वेळ घालवत आहेत.

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुबोध भावे.

नाटक, मालिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमांमध्ये त्याचा सक्रीय वावर आहे.

सोशल मीडियावरही सुबोध कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्याविषयी कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.

सुबोधच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही.

सध्या सोशल मीडियावर सुबोध भावेच्या फॅमिलीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

सुबोध त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत सध्या व्हेकेशन एन्जॉय करतोय. या पिकनिकचे फोटो त्याची पत्नी मंजिरी हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सुबोधची मोठी फॅमिली असून ते एकमेकांसोबत सध्या निवांत वेळ घालवत आहेत.

व्हेकेशन एन्जॉय करतांना भावे कुटुंबीय