मराठमोळ्या केळीवालीचे ग्लॅमरस फोटो आले समोर, सोनालीच्या या लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:42 IST2021-12-01T15:14:33+5:302021-12-01T15:42:20+5:30

सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस फोटोंची होतेय चर्चा

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

सोनाली कुलकर्णी पांडू या चित्रपटातून लवकरच भेटीला येणार आहे. यात तिने उषा केळेवालीची भूमिका साकारली आहे.

सोनाली कुलकर्णी पांडू या चित्रपटातून वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पांडू सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत भाऊ कदम मुख्य भूमिकेत आहे.

पांडू सिनेमा ३ डिसेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

या व्यतिरिक्त सोनालीचा नुकताच झिम्मा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सोनाली कुलकर्णी नुकतीच ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.