केसात गजरा, नाकात नथ अन् नऊवारी साडी, रिंकू राजगुरूच्या मराठमोळ्या सौंदर्याने चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 15:40 IST2024-11-02T15:31:07+5:302024-11-02T15:40:02+5:30
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर नऊवारी साडीतलं फोटोशूट शेअऱ केले आहे.

सध्या सोशल मीडियावर मराठी कलाकारांचे दिवाळी स्पेशल फोटोशूट पाहायला मिळत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही स्पेशल फोटोशूट केलंय.
रिंकूने दिवाळी निमित्त पारंपारिक अंदाजात फोटोशूट केले आहे.
रिंकू राजगुरूने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
रिंकूने नऊवारी साडीवर गळ्यात नेकलेस घातला आहे. केसाचा आंबाडा आणि त्यावर गजरा अन् नाकात नथ घातली आहे.
रिंकू मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
रिंकू राजगुरूच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.