फॅशनेबल अप्सरा सोनाली कुलकर्णीचा स्टायलिश अंदाज, चाहत्यांचे वेधून घेतोय लक्ष, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 17:23 IST2021-05-13T17:18:17+5:302021-05-13T17:23:46+5:30
सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे.
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सोनाली कुलकर्णी स्टनिंग दिसते आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसते आहे.
लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
तर 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिलीये.
सोनाली कुलकर्णी शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.