'फॅण्ड्री'तली शालू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:01 IST2025-11-25T18:55:33+5:302025-11-25T19:01:44+5:30

Rajeshwari Kharat : 'फॅण्ड्री'मध्ये राजेश्वरी खरातने साकारलेली 'शालू'ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि ती हिट ठरली.

नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

'फॅण्ड्री'मध्ये राजेश्वरी खरातने साकारलेली 'शालू'ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि ती हिट ठरली.

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे आणि फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत असते.

आता राजेश्वरी खरातमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तिचा हा बदललेला लूक चाहत्यांना खूपच पसंत पडत आहे. त्यामुळे, चाहते तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

राजेश्वरी खरात दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चालली आहे. त्यामुळे, तिच्या फॅन फॉलोईंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

लवकरच राजेश्वरी खरात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'पुणे टू गोवा' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

याव्यतिरिक्त, ती आणखी काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.