बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, जाणून घ्या त्याच्या विषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:00 AM2021-08-29T09:00:00+5:302021-08-29T09:00:00+5:30

अभिनय क्षेत्रात काम करता करता कलाकार एकमेंकाच्या प्रेमात पडतात. अनेक कालाकारांनी आपल्या आवडीच्या कलाकारासह लग्न करत संसार थाटला आहे. अभिनेत्री सोनाली खरेनेही प्रसिद्ध अभिनेत्यासह लग्न करत संसार थाटला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सोनाली खरेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते.

कुटुंबासह मजा मस्ती करतानाचे फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते.

सोनाली खरे जितकी प्रसिद्ध तितकेच तिचे पतीही प्रचंड प्रसिद्ध आहेत.

सोनाली खरेने बॉलिवूडमधला अभिनेता बिजय आनंदसह लग्न केले आहे.

बिजयने सिनेमात झळकण्यापूर्वी मालिकेत काम केले होते.

१९९८ साली 'प्यार तो होना ही था' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सिनेमात काजोल आणि अजय देवगणसह बिजय आनंदच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती.

‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे सिनेमे आणि काही हिंदी टीव्ही मालिकेतून विजय आनंदने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सोनाली आणि विजय आनंद यांना एक मुलगी आहे.सनाया आनंद असे तिचे नाव आहे.

Read in English