श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकरने 'या' सिनेमातून दिली होती त्यांच्या प्रेमाची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:55 PM2021-08-30T16:55:08+5:302021-08-30T17:01:32+5:30

छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणाऱ्या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.अशीच कलाकाराची एक जोडी म्हणजे श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर यांची.

श्रुती आणि गौरवची या दोघांची लव्हस्टोरी 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती.

एकत्र काम करता करता दोघेही प्रेमात पडले. तीन वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते.

एकमेकांच्या आवडी- निवडी समजून घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

4 डिसेंबर 2016 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते.

पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला होता.

छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.

मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाने छाप पाडली होती.

श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दोघांमध्ये असणारी केमिस्ट्री पाहून चाहतेही कपलच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत असतात.