मानसी नाईकची पहिली कमाई किती होती माहित्येय का?, खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:00 AM2023-08-02T07:00:00+5:302023-08-02T07:00:00+5:30

मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते.

मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते. आधी घटस्फोट आणि नंतर नवीन घरात प्रवेश या कारणाने ती सध्या चर्चेत असते.

मानसी आता तिच्या घटस्फोटानंतर सावरत आहे आणि आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करत आहे हेच वेळोवेळी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून समजते.

नुकतेच एका मुलाखतीत मानसीने तिच्या पहिल्या मानधनाबाबतचा खुलासा केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मानसीने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

या मुलाखतीत मानसी नाईकला विचारण्यात आले की, तुझे पहिले मानधन किती होते. याला उत्तर देताना मानसी म्हणाली, मला पहिले मानधन म्हणून ५०० रुपये मिळाले होते. मी त्यावेळेस गश्मीर महाजनीसोबत लीड म्हणून डान्स केला होता. त्यावेळेस मी अभिनय क्षेत्रात आले नव्हते.

आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते.

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मालिका, चित्रपटांमधील अभिनयाच्या जोरावर मानसीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.