अजिंक्य देवच्या पत्नीला पाहिलंत का?, रस्त्यात अडवून केलं होतं लग्नासाठी प्रपोझ, वाचा ही प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:57 PM2023-05-03T16:57:02+5:302023-05-03T17:07:22+5:30

अजिंक्य देवचा ३ मे रोजी वाढदिवस असतो. या निमित्ताने जाणून घेऊयात त्याची फिल्मी लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि 'हिरो' या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे 'अजिंक्य देव' (Ajinkya Deo). अजिंक्य देवचा ३ मे रोजी वाढदिवस असतो.

अजिंक्य देवने फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे.

अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचा धाकटा मुलगा आहे. अजिंक्य देवची पत्नी आरती देव लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. अभिनेत्याची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे.

अजिंक्य देव आणि आरती हे दोघे एकमेकांना कॉलेजपासून ओळखायचे. मात्र त्यांची लव्ह स्टोरीही तितकीच फिल्मी आणि हटके आहे. पार्ल्यात महाविद्यालयात असताना BScच्या पहिल्या वर्षात आरती आणि अजिंक्यची ओळख झाली.

अजिंक्य तेव्हा सिनेइंडस्ट्रीत दाखलदेखील झाले नव्हते मात्र रमेश देव यांचा मुलगा ही त्यांची सर्वांना ओळख होती. आरतीला अजिंक्यबाबत माहीत होते मात्र ओळख नव्हती.

अजिंक्यने ज्यावेळी आरतीला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. याशिवाय त्यांचा एक ट्रेकिंगचा ग्रुपही तयार झाला होता. एकत्र ट्रेकिंगला जाणे वाढले होते आणि एकमेकांशी बोलणेही वाढले होते मात्र दोघांमध्ये जवळीकता वाढली नव्हती. आरती आवडत असल्यामुळे तिला प्रपोज करायचे अजिंक्यने ठरवले.

अजिंक्य आरतीच्या खूपच प्रेमात असल्यामुळे त्याने एकदा तिला प्रपोज करायचे ठरवले आणि तेदेखील जुहू बीचवर गाडी आडवी लावत त्याने तिला मागणी घातली. आपण मागणी घातल्यावर आरती होकार देणार याच विचारात अजिंक्य होते. मात्र अजिंक्यने विचारल्यावर आरती रडायला लागल्या आणि अजिंक्यला घाम फुटला. त्याला कारणच कळत नव्हते.

त्यानंतर बरेच दिवस आरती त्याच्याशी बरेच दिवस बोलत नव्हत्या. पण अजिंक्यला राहावत नव्हते आणि त्यांनी थेट आरतीला हो किंवा नाही विचारायचे ठरवले. पुन्हा एकदा आरतीच्या समोर जात थेट विचारणा केली आणि नकार असेल तर आयुष्यात निघून जाईन असेही सांगितले. हे ऐकून आरतीने होकार दिला.

कॉलेजमध्येच दोघांचे सुत जुळले. आरतीच्या घरीदेखील कळले. पण अजिंक्य इंडस्ट्रीतील असल्यामुळे आरतीला सुखात ठेवतील की नाही ही भीतीही होती. मात्र आरती ठाम असल्यामुळे त्यांचे काहीच चालले नाही. देव कुटुंबीयांनाही आरती आवडली आणि वयाच्या २३-२४ व्या वर्षीच दोघांनी लग्न केले.

तरूणपणीचे हे प्रेम आजही असेच टिकून आहे. अजिंक्य आणि आरतीचा ३५ वर्षांपेक्षाही अधिक सुखाचा संसार चालू आहे. एक मुलगी जी स्पेशल चाइल्ड आहे आणि एक मुलगा असे चौकोनी कुटुंब अजिंक्यचे आहे. या जोडप्याने स्पेशल चाईल्डसाठी शाळा उघडली असून त्यांच्या विकासासाठी कार्यरत आहेत.