मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकरचा नवरा आहे साउथ आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:16 IST2023-01-22T06:00:00+5:302023-01-23T13:16:15+5:30
अश्विनी काळसेकरचा पती साऊथमधील प्रसिद्ध नाव आहे. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम देखील केलंय.

अश्विनी कळसेकरने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. (Photo Instagram)
अश्विनीला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली.(Photo Instagram)
अश्विनीने या मालिकेनंतर कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.(Photo Instagram)
तिने मालिकांप्रमाणेच मुसाफीर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)
अश्विनीचे लग्न साऊथ आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मुरली शर्मासोबत झाले आहे.(Photo Instagram)
मुरली शर्माने मकबूल, मार्केट, मैं हूँ ना, अपहरण, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)
गोलमाल या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते.(Photo Instagram)
मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहाणेच पंसत करतो.(Photo Instagram)
अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी 2009 मध्ये लग्न केले. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.(Photo Instagram)