सहजीवनाची २५ वर्षं ! 'आपण लग्न करु का नाही...', प्रसाद ओकच्या पत्नीनं सांगितली प्रेमाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:56 PM2023-01-07T15:56:29+5:302023-01-07T16:51:16+5:30

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak). प्रसादप्रमाणेच मंजिरीही कलाविश्वात सक्रीय असून तिने प्रसादसह अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट डारेक्टरचं काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मंजिरी आणि प्रसाद यांचं लव्ह मॅरेज आहे. आज त्यांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. मंजिरी आणि प्रसाद यांना मयांक आणि सार्थक नावाची दोन मुले देखील आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

"प्रसादच्या एक अॅक्टिंगचं वर्कशॉप दोघांची भेट झाली होती. मंजिरी प्रसादची विद्यार्थिनी होती. प्रसादने पाच एकांकिका बसवल्या होत्या आणि या सगळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला कास्ट केलं होतं. फक्त मंजिरी एकटीच राहिले होती जिला कशातच घेतलं नव्हतं. मी सुद्धा पैसे भरलेत मग मलाही काम मिळायला हवं. म्हणून मंजिरी जाऊन त्याला भेटली आणि सांगितलं की मलाही काम करायचंय. त्यावर, तुझ्यासाठीही काम शोधतोय असं त्यांने तिला सांगितलं. या काळात कामाच्या निमित्ताने आमचा कॉन्टॅक्ट वाढला होता आणि एकमेकांना आवडायला लागल्या. मग त्या दोघांनी लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

मंजिरीनं प्रसादसोबतचे काही खास फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे, मंजिरी लिहिते, प्रिय प्रसाद ..९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस.आणि त्यामुळे आपल्यामधे काही दिवस “रणांगण” तापलं होतं.(फोटो इन्स्टाग्राम)

''पण हळू हळू"अशी बायको हवी" म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही "साहेबजी डार्लिंग" झालीच.'' (फोटो इन्स्टाग्राम)

आणि "धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला . तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “आहे .(फोटो इन्स्टाग्राम)

पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते .(फोटो इन्स्टाग्राम)

ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी"???आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं" म्हणतच राहुयात. '' (फोटो इन्स्टाग्राम)