PHOTOS: धर्मवीर रिलीज होऊन दीड महिन्यात प्रसाद ओकमध्ये झाला इतका बदल, फोटो पाहून व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:43 PM2022-07-05T15:43:21+5:302022-07-05T16:05:06+5:30

मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer Mukkam Post Thane) या सिनेमात प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे ( Dharamveer Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती.(Photo Instagram)

प्रसाद ओकने या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे.(Photo Instagram)

इतकंच नव्हे तर आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून आलं. इतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टींवर प्रसादनं अत्यंत बारकाईनं काम केलं आहे.(Photo Instagram)

चित्रपटातील प्रसादचा अभिनय पाहून सगळेच भारावून गेले. आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत. (Photo Instagram)

चित्रपट रिलीज होऊन दीड महिनानंतर प्रसादचा नवा लूक चाहत्यांसमोर आला आहे.(Photo Instagram)

काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. टी-शर्टवर लाल रंगाचं जॅकेट घातलं असून त्याचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. (Photo Instagram)

धर्मवीरनंतर बऱ्याच दिवसांनी प्रसादचा थोडा हटके अंदाजात दिसतोय. धर्मवीरनंतर प्रसादने आता आपला लूक चेंज केल्याचं दिसतंय. (Photo Instagram)