आवडती अभिनेत्री कोण? अशोक सराफ यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव, म्हणाले- "मी तिच्यासोबत.."
By देवेंद्र जाधव | Updated: March 31, 2025 18:09 IST2025-03-31T17:26:47+5:302025-03-31T18:09:26+5:30
अशोक सराफ यांनी आवडती अभिनेत्री म्हणून एका खास अभिनेत्रीचं नाव घेतलंय. ज्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटलं (ashok saraf)

अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील महानायक. अशोकमामा गेली अनेक वर्ष मराठी, हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत.
अशोकमामांनी गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. अशातच एका मुलाखतीत अशोकमामांना आवडत्या अभिनेत्रीविषयी विचारण्यात आलं.
आवडती अभिनेत्री कोण? असं विचारताच अशोकमामांनी पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं नाव न घेता एका वेगळ्या अभिनेत्रीचं नाव घेतलं.
ही अभिनेत्री आहे रंजना. अशोकमामांना आवडत्या अभिनेत्रींविषयी विचारताच त्यांनी रंजनाचं नाव घेतलं.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले. "अभिनेत्री म्हणून तिने माझ्यासोबत सर्वात जास्त काम केलंय. अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलंय ती म्हणजे रंजना", अशाप्रकारे अशोकमामांनी भावना व्यक्त केल्या.
अशोक सराफ आणि रंजना यांचे अनेक सिनेमे चांगलेच गाजले. 'बिनकामाचा नवरा', 'एक डाव भुताचा' अशा सिनेमांमध्ये अशोक सराफ- रंजना यांची जोडी चांगलीच गाजली.
रंजना आज हयात नसल्या तरीही त्यांची आणि अशोक सराफ यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी मानली जाते. दोघांच्या विनोदाचा अफलातून टायमिंग अनेकांना आजही तितकाच आवडतो