'अशी ही बनवाबनवी'मधील 'शंतनु'ची शांतीप्रिया, टक्कल केल्यामुळे आलेली चर्चेत, आता सांगितलं त्यामागचं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:49 IST2025-09-03T15:38:08+5:302025-09-03T16:49:10+5:30
शांतीप्रियाने काही महिन्यांपूर्वी टक्कल करत नवऱ्याचं ब्लेझर घालून फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती.

'अशी ही बनवाबनवी' हा मराठीतील सुपरहिट आणि अजरामर असलेला सिनेमा. या सिनेमातील भूमिकाही प्रेक्षकांना आवडल्या होत्या. सिनेमात शंतनुची भूमिका अभिनेता सिद्धार्थ रे याने साकारली होती.
सिद्धार्थने २००४ साली या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थची पत्नी शांतीप्रियादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शांतीप्रियाने काही महिन्यांपूर्वी टक्कल करत नवऱ्याचं ब्लेझर घालून फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती.
प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तिने असं फोटोशूट केल्याचं काहींचं म्हणणं होतं. तर सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झाल्याने शांतीप्रियाने त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट केल्याचंही म्हटलं जात होतं.
पण, आता शांतीप्रियाने या फोटोशूटमागचं खरं कारण सांगितलं आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी हे फोटोशूट केलं नसल्याचं तिने म्हटलं आहे.
"मी लक्ष वेधून घेण्यासाठी हे फोटोशूट केलेलं नव्हतं. त्यासाठी मला फोटोशूट करायची गरज नाही".
"मला असं वाटलं की पुरुष सगळं काही करू शकतात. ते केसही वाढवतात. आपण हायलाइट करतो आणि केस कापतो".
"जर ते सगळं काही करू शकतात तर मग आपण का नाही? केस तर परत येतात. त्यामुळे मी विचार केला की आपणही टक्कल करूया", असं शांतीप्रियाने सांगितलं.