Instagramवर नेहमी अॅक्टिव असते अमृता खानविलकर, पाहा Different Looks आणि Moods
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 16:32 IST2020-09-16T16:25:51+5:302020-09-16T16:32:43+5:30
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते. तिच्या प्रत्येक अंदाजाला रसिकांची पसंती मिळत असते.

अमृताच्या घरात कोणीही मराठी सिनेइंडस्ट्रीशळी संबंधित नाही पण अमृताला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती आणि त्याच ध्यासापोटी अमृता मुंबईत पोहोचली.
कोणीही गॉडफादर नसताना अमृताने तिच्या बळावर हे यश निर्माण केले आहे त्याबाबत तिच्या आईवडीलांना फार अभिमान आहे.
अमृता आईच्या सर्वात जास्त क्लोज आहे आणि नेहमीच तिच्यासोबत देश-विदेशात व्हॅकेशनवर जात असते.
मराठीनंतर हिंदीतही तिचे करिअर आजमावले आणि 'मुंबई सालसा' या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अभिनय केला.
2012 साली हिंदी अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर अमृताने तिच्या करिअरला फुलस्टॉप न लावत मराठी तसेच हिंदी मनोरंजनक्षेत्रातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अमृता आणि हिमांशु लग्नाअगोदर 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
हिमांशु आणि अमृताची पहिली भेट 2004 साली आलेल्या इंडियाज् बेस्ट सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती.
यावेळी झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अमृता आणि हिमांशु यांनी नच बलिए 7 मध्ये विनर बनले होते. हे दोघेही उत्तम डान्सर असल्याने त्यांची जबरदस्त केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली.
विनामेकअप लूक वाले फोटो चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत.
या फोटोतून तिचा वेगवेगळ्या मुडचाही अंदाज तुम्हाला येईल.