क्रिकेटरनंतर आता सायली संजीवचं बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत जोडलं जातंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:04 PM2023-07-07T19:04:16+5:302023-07-07T19:06:56+5:30

Sayali Sanjeev : 'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. या मालिकेच्या माध्यमातून सायलीने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली.

'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. या मालिकेच्या माध्यमातून सायलीने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली.

सायलीने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचा बस्ता हा सिनेमा विशेष गाजला. या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. तिचे नाव भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्यासोबत नेहमी जोडले गेले.

सायली संजीवने अनेकदा त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले आहे. या दोघांच्यात काहीच नव्हते हे तिने अनेकदा स्पष्ट केले आहे. आता ऋतुराज गायकवाडने लग्नदेखील केले आहे. त्यानंतर या दोघांच्यात काही नव्हते हे स्पष्ट झाले आहे.

आता यानंतर अभिनेत्री सायली संजीव पुन्हा चर्चेत आली आहे. कारण बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत सायली संजीव स्पॉट झाली आहे. त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून कार्तिक आर्यन आहे.

सायली सत्यप्रेम की कथाच्या एका इव्हेंटमध्ये कार्तिकला भेटली. त्यावेळचा हा फोटो आहे. तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी या फोटोला खूप पसंती दर्शवली. त्यांनी रबने बना दी जोडी अशीदेखील कमेंट केली आहे.

सत्यप्रेम की कथा चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केले आहे. खरेतर समीरसाठी सायलीने एक प्रशंसा करणारी पोस्ट लिहिली आहे. यासोबत तिने समीरसोबत आणि कार्तिकसोबत फोटो शेअर केला आहे. यावरूनच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. समीर आणि सायली चांगले मित्र आहेत.