सिनेसृष्टीतून ब्रेक घेत सायली संजीव वळली शिक्षणाकडे, फोटो शेअर करत म्हणाली, शिकायचं कधी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 08:00 IST2023-08-12T08:00:00+5:302023-08-12T08:00:07+5:30
कलाविश्वातून ब्रेक घेत सायलीने अभ्यासाचा ध्यास घेतला आहे.

'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव सध्या माहाराष्ट्राची क्रशच बनली आहे. तिचे वेगवेगळे लुक चाहत्यांना घायाळ करत आहेत.
नाशिकची सायली संजीव नेहमी साध्या, सालस, सोज्वळ लुकमध्ये दिसते. तिचा हा साधा स्वभाव चाहत्यांनाही फारच भावतो.
सायलीने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचा बस्ता हा सिनेमा विशेष गाजला. या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते.
शिकायचं कधी थांबवू नका असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं होतं. सायलीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.
सायली पॉलिटिक्ल सायन्समध्ये मास्टर्स करते आहे. अभिनयातून ब्रेक घेत तिने शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आहे. यावर तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सायलीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत ती झळकली होती.
सायलीने 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.