मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने हात जोडून मागितली माफी, म्हणाले- दुर्दैवानं..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 04:07 PM2023-03-25T16:07:30+5:302023-03-25T16:56:42+5:30

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल उमेश आणि प्रिया बापटचा सोशल मीडियावर व्हायरल होतेय यात ते सगळ्यांची माफी मागतायेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रिया-उमेश दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि या जोडीचे खूप फॅन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

बऱ्याचदा ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंंती देखील मिळताना दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)

सध्या दोघांची एक पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यात दोघे रसिकांची माफी मागतायेत.(फोटो इन्स्टाग्राम)

अचानक प्रिया - उमेशने सोशल मीडियावर घोषणा करून दादा एक गुड न्युज आहे नाटकाचे आगामी प्रयोग रद्द केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रिया आणि उमेशने येत्या आठवड्यात ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

उमेशला डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दुर्दैवानं या कारणामुळे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे पुढचे काही प्रयोग रद्द करावे लागत आहेत.' तसेच ज्यांनी या नाटकासाठी आगाऊ बुकींग केलं आहे, त्यांचे पैसे रिफंड केले जातील असं त्यांनी सांगितलंय.(फोटो इन्स्टाग्राम)

या नाटकात उमेश सोबत आशुतोष गोखले, आरती मोरे, मृगा बोडस अशी तगडी स्टारकास्ट आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रिया बापटने या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)