Photos: मराठमोळ्या मितालीचा खास लूक; लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:37 IST2025-01-20T15:13:08+5:302025-01-20T15:37:03+5:30
मितालीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरने (Mitali Mayekar) नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये मितालीनं हे फोटोशूट केलं आहे.
मितालीच्या या लूकला तिची केशरचनाही खूपच शोभून दिसत आहे.
सुंदर अशी ज्वेलरी परिधान करुन मितालीनं हा लूक पुर्ण केलाय. तिचे हे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.
मितालीनं परिधान केलेल्या ड्रेसवर सिल्वर रंगाची किनार असून, त्यावर तपशीलवार डिझाईन आहे.
अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि अनोख्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच ती स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते.
मिताली सोशल मीडियावर सतत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.
लवकरच ती 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.