"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:26 IST2024-12-17T16:18:56+5:302024-12-17T16:26:00+5:30
मराठी मनोरंजनविश्वातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची तगडी फॅनफॉलोइंग आहे.
नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीने अतिशय सुंदर लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे.
अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
"Shaddi Ready..."असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.