लक्ष्याची लेक लावतीये नेटकऱ्यांना 'याड'; स्वानंदी बेर्डेचं लेटेस्ट फोटोशूट येतंय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 07:00 IST2022-03-24T07:00:00+5:302022-03-24T07:00:01+5:30

Swanandi berde:अलिकडेच स्वानंदीने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर आजीवन राज्य करणारा दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.

आपल्या अभिनयशैली आणि संवादफेक कौशल्यामुळे लक्ष्मीकांतचा लक्ष्या झाला आणि तो प्रत्येक प्रेक्षकांच्या कुटुंबातील एक सदस्य झाला.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन होऊन आज बरीच वर्ष उलटली. मात्र, त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

लक्ष्मीकांत यांच्या कुटुंबाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. यात सध्याच्या घडीला त्यांची लेक स्वानंदी नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लक्ष्मीकांत यांचा लेक अभिनय बेर्डे त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत येत आहे. तर लेक ग्लॅमरस फोटोशूटमुळे.

अलिकडेच स्वानंदीने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये स्वानंदीने फोटोशूट केलं असून तिचे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहेत.

मैं भी गुलाबी तू है गुलाबी..अशा गाण्याच्या ओळी कॅप्शनमध्ये देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.