'रामायण'च्या टीझरमध्ये दिसली 'या' मराठी अभिनेत्याची झलक; रणबीरसह गाजवणार सिनेमा, कोण आहे तो?
By देवेंद्र जाधव | Updated: April 2, 2026 15:23 IST2026-04-02T14:54:48+5:302026-04-02T15:23:04+5:30
रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या टीझरमध्ये एका मराठी अभिनेत्याला पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत. कोण आहे तो?

रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. कारण आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये एका मराठी अभिनेत्याला पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत

या टीझरमध्ये रणबीर कपूरला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत सर्वांसमोर सादर करण्यात आलं. रणबीर कपूरला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

रामायणच्या या टीझरमध्ये मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेची झलक पाहायला मिळाली. डोक्यावर मुकुट, सुंदर वस्त्र आणि गळ्यात दागिने अशा रुपात आदिनाथ कोठारे दिसतोय.

आदिनाथ कोठारे या सिनेमात श्रीरामांचा भाऊ भरत यांची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये श्रीराम, दशरथ, भरत, लक्ष्मण यांची एक फ्रेम दिसते. त्यात आदिनाथ कोठारे श्रीरामांच्या मागे उभा असलेला दिसतोय.

मराठमोळ्या आदिनाथला इतक्या मोठ्या सिनेमात पाहून चाहत्यांना आनंद दिला आहे. आदिनाथ कोठारेला 'रामायण' सिनेमात भरताच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे.

'रामायण' सिनेमाबद्दल सांगायचं तर, सिनेमात एकापेक्षा एक कलाकार बघायला मिळणार आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे यांसह अरुण गोविल, लारा दत्ता हे कलाकार झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, सनी देओल या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर लंकेश रावणाच्या भूमिकेत यश दिसणार आहे. सर्वांना 'रामायण' सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.

















