अभीं तो मैं जवान हूँ…..करिना कपूर खानच्या घराबाहेर स्पॉट झाली मलायका अरोरा, वयाच्या ४७ व्या वर्षीही दिसते लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 15:52 IST2020-11-09T12:57:43+5:302020-11-09T15:52:33+5:30
पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. वयाची चाळीशी ओलांडूनही मलाका अरोराचे फोटो पाहून तुमचीही तिच्यावरून नजर हटणार नाही.

मलायका करिअरच्या सुरूवातीच्या आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.
बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मलायका ओळखली जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून मलायका सिनेसृष्टीत काम करते आहे.
मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की ती लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे.
या वयातही तिने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. मलायकाचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते.
आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.
म्हणूनच या वयातही ती अधिक फिट आणि सुंदर दिसते.