और हंगामा हो गया...! अशा अवतारात जॉगिंगला निघाली मलायका अरोरा की, बघणारे थक्क झालेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 14:28 IST2020-11-11T14:20:33+5:302020-11-11T14:28:07+5:30
फोटो व्हायरल

बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा फिटनेससाठी किती क्रेजी आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कोरोना काळातही तिचे फिटनेसचे वेड जराही कमी झालेले नाही. अलीकडे मलायका संध्याकाळी जॉगिंग करायला निघाली आणि तिच्या या फोटोंनी जणू धुमाकूळ घातला.
होय, मलायका जॉगिंग करण्यासाठी घराबाहेर पडली आणि तिचा अंदाज पाहून सगळेच थक्क झाले.
रिफलेक्टिंग शॉट्समधील तिच्या या जॉगिंगचे फोटो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. क्षणात हे फोटो व्हायरल झालेत.
कोरोनापासून बचावासाठी मलायकाने यावेळी तोंडाला मास्क लावला होता. पण तरीही फोटोग्राफर्सनी तिला ओळखलेच.
मलायकाची छबी कॅमे-यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर सरसावले, त्यांना मलायकाने हात हलवून अभिवादन केले.
फिटनेसच्या यादीत मुन्नी अर्थात मलायका अरोरा यात आघाडीवर आहे.
मलायका अरोराने आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि स्टाइलने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.
मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.
मलायका बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.