"ओंकार भोजनेचं टी शर्ट", शिवाली परबच्या फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 13:16 IST2024-07-23T13:11:59+5:302024-07-23T13:16:34+5:30
शिवालीने घातलं ओंकारचं टी शर्ट? अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधूनच अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते.
शिवालीने नुकतंच हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोंमध्ये शिवालीने शॉर्ट आणि टीशर्ट घालून राऊडी लूक केल्याचं दिसत आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
शिवालीने फोटोत घातलेल्या टीशर्टवर "ONKER 71" असं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
"फक्त थोडंसं नावाचं स्पेलिंग चुकलं आहे", "अरे ओंकार भोजनेचा टीशर्ट" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
"ओंकारचं टीशर्ट घातलंस का?", अशी कमेंटही एका चाहत्याने शिवालीच्या या फोटोंवर केली आहे.
शिवालीने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. प्रेम प्रथा धुमशान या सिनेमात शिवालीने मुख्य भूमिकाही साकारली होती.