कल्याणची चुलबुली शिवाली परबच्या न्यू यॉर्कच्या रस्त्यावर स्टायलिश अदा, फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:58 IST2024-10-01T15:35:49+5:302024-10-01T15:58:10+5:30

कल्याणची चुलबुली म्हणून ओळख असणाऱ्या शिवाली परबने न्यू यॉर्कला जाऊन केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (shivali parab, maharashtrachi hasyajatra)

कल्याणची चुलबुली नावाने शिवाली परब प्रसिद्ध आहे. शिवाली परबला आपण महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून खळखळून हसवताना बघितलंय

शिवाली परब नुकतीच न्यू यॉर्कला गेली आहे. तिथे ब्रीज आणि न्यू यॉर्कच्या खास रस्त्यांवर शिवाली परबने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे

पिंक कलरचा ड्रेस आणि काळे बूट अशा खास स्टायलिश अंदाजात शिवाली परबने हे फोटोशूट केलंय.

डोळ्यांवर चष्मा लावून शिवाली परबने फोटोसाठी खास पोज दिली आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय

शिवाली परबने तिच्या मेहनतीच्या आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय

शिवाली परब प्रचंड मेहनत, हुशारी आणि चिकाटीच्या जोरावर आज महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.

शिवाली परबला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखलं जातं. सध्या शिवाली न्यू यॉर्कला महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमसोबत परदेश दौरा करतेय