नऊवारी साडीत माधुरी दीक्षितचा लूक पाहून रसिक पुन्हा एकदा म्हणतील, मार डाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:49 IST2021-03-24T20:41:28+5:302021-03-24T20:49:00+5:30

Madhuri dixit in nauvari saree :झुमके ठुमके, लटके झटके याची झाली जादू.... धकधक गर्ल म्हणून अशी तिची ओळख तर होती.. मात्र या कोल्हापुरी मिरचीच्या लावणीचा जलवा बॉलीवुड आणि रसिकांना चांगलाच भावला.

माधुरीने या लावणीवर लावलेले ठुमके तेव्हा तर सुपरहिट ठरले, आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

आजही मराठमोळ्या माधुरीच्या लावणीचा अंदाज पाहून रसिकांचे पाय आपसुकच थिरकू लागतात.

माधुरी दीक्षितचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नथ आणि कपाळावर चंद्रकोर माधुरीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे.

मराठमोळ्या पद्धतीने नेसलेली पारंपरिक नऊवारी साडी, गळ्यात मोठं मंगळसूत्र, दागिने, नाकात नथ, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे माधुरीचे सौंदर्य खुलून गेले आहे.

माधुरी नेहमीच आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे फोटो पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

माधुरीच्या चाहत्यांना तिचा हा नऊवारी साडी लुक अतिशय आवडला आहे.

दिवसेंदिवस माधुरी अधिक फिट आणि तितकेच तिचे सौंदर्य अधिकच खुलत चाललंय.

आजही सोशल मीडियावरील तिचे स्टायलिश फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरंच कठीण होते.

माधुरी दीक्षितच्या मोहक अदांमुळे चाहते आजही घायाळ होतात.