पॉवर परफॉर्मर राजकुमारचा पॉवरफुल अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 15:39 IST2018-12-20T15:35:37+5:302018-12-20T15:39:38+5:30

मुंबईत रंगलेल्या 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्याला बॉलिवूडमधील 'न्यूटन' अभिनेता राजकुमार राव यानेही हजेरी लावली. यावेळी राजकुमार राव याला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर या पुरस्काराने गौरवण्यात आले. राजकुमारने आपल्या प्रत्येक चित्रपटांतून आपल्या पॉवरफुल परफॉर्मन्सने अख्ख्या बॉलिवूडला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडले. राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'न्यूटन' या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.