विकेंडसाठी खास मेजवाणी; ओटीटीवरील 'या' सीरिज, चित्रपट करतील प्रेक्षकांचे मनोरंजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:36 IST2025-09-18T16:22:58+5:302025-09-18T16:36:01+5:30
पाहूयात या विकेंडला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

latest OTT Theater Releases: दर आठवड्याला मोठमोठ्या फिल्म्स आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आणि थिएटर्समध्ये रिलीज होतात. या आठवड्यातही प्रेक्षकांना विविध धाटणीचे चित्रपट, वेब सीरिजची मेजवानी मिळणार आहे.
अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा कोर्टरूम ड्रामा 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) १९ सप्टेंबर शुक्रवारी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
लोकप्रिय अभिनेत्री काजोल लवकरच 'द ट्रायल' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून (The Trial Season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज १९ सप्टेंबरला Jio Hotstar वर प्रदर्शित होईल.
हाउसमेट्स (House Mates) ही तमिळ हॉरर कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. १ ऑगस्ट २०२५ ला रिलीज झालेली ही फिल्म आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही फिल्म तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.
'शी सेड मे बी' (She Said May Be) ही जर्मन रोम-कॉम फिल्म आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.
स्वाइप्ड (Swiped) ही बायोग्राफिकल फिल्म अमेरिकन उद्योजिका व्हिटनी वोल्फ हर्ड यांच्यावर आधारित आहे. त्या Bumble च्या संस्थापक आणि Tinder च्या सह-संस्थापक आहेत. त्यांनी वेगवेगळे डेटिंग अॅप्स लाँच करून पुरुषप्रधान टेक इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. ही फिल्म तुम्ही Jio Hotstar वर पाहू शकता.
सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली पहिली वेब सीरिज "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ही सीरिज आज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील राजकारण, संघर्ष आणि ग्लॅमरचे जग जवळून दाखवलं आहे.