जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी दिले होते सरप्राईज गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:59 IST2021-05-05T15:52:24+5:302021-05-05T15:59:30+5:30

बिपाशा बासूने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न करत संसार थाटला. दोघांचाही सुखी संसार सुरु आहे. दोघांमध्ये खूप चांगील केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळेत. लग्नानंतर दोघांचेही नाते आणखीन घट्ट झाल्याचेही पाहायला मिळते.

बिपाशा बासून करण सिंग ग्रोवरसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी जॉन अब्राहमसोबत नात्यात होती.

बिपाशा आणि जॉन अब्राहम दोघांची जोडी खूप जास्त पसंत केली जायची.

दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे.

तब्बल नऊ वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते.

दोघेही लिव्ह इनमध्येही राहत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.

बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, बंगाली जेवण तिला खूप जास्त आवडते. त्यामुळे वजनही जास्त वाढले होते.

मी एकापाठोपाठ सिनेमे करण्यात बिझी होती, स्वतःकडे फारसे लक्ष द्यायला वेळ नव्हता.

त्यावेळी माझे वजन वाढू नये यासाठी जॉन अब्राहमने मला एक गोष्ट सरप्राईज म्हणून दिली.

जॉनने माझ्या वाढदिवशी एक ट्रेडमिल गिफ्ट केले होते. यामूळे मी घरीच वर्कआऊट करु शकले.

२०१४ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले.जॉनने प्रिया रुंचालसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली .