किशोरी अंबिये यांची लेकही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:38 IST2024-03-11T13:35:01+5:302024-03-11T13:38:19+5:30
किशोरी अंबिये यांच्याप्रमाणेच त्यांची लेकही अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेदेखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

किशोरी अंबिये या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.
गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयाने त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. किशोरी अंबिये यांच्याप्रमाणेच त्यांची लेकही अभिनेत्री आहे.
आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेदेखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. किशोरी आंबिये यांच्या लेकीचं नाव काजल असं आहे.
काजल सध्या स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
नुकतंच काजलने किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मायलेकीच्या या सुंदर फोटोला तिने "आज मी जी काही आहे ती तुझ्यामुळे आहे", असं कॅप्शन दिलं आहे.
कॉलेज जीवनापासूनच काजलने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.
'धडकन', 'घर एक मंदिर' या हिंदी मालिकांमध्येही काजल झळकली आहे.
'काय घडलं त्या रात्री' या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
किशोरी अंबिये आणि काजलने 'कुलस्वामिनी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं.