क्लासी, गुलाबी अन् बोल्ड! खुशी कपूरचं 'व्हिंटेज' सौंदर्य; मादक अदांनी चाहते घायाळ (PHOTOS)
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 21:07 IST2026-03-06T20:31:24+5:302026-03-06T21:07:54+5:30
Khushi Kapoor vintage bold photos: मादकतेच्या बाबतीत सख्खी बहीण जान्हवी कपूरला तगडी स्पर्धा

Khushi Kapoor vintage bold photos:
नवोदित कलाकार खुशी कपूर ही 'द आर्चीज' सिनेमापासून वेदांग रैनाशी रिलेशनशिपमध्ये होती. पण काही दिवसांपूर्वीच अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सुरु झाल्या.

अनेक इव्हेंट्समध्ये दोघे हातात हात घालून यायचे. मात्र आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. त्यांचं दोन वर्षांचं नातं अचानक संपलं, याचा चाहत्यांनाही धक्का बसला.

खुशी ही निर्माते बोनी कपूर यांची धाकटी लेक. तिची मोठी बहीण जान्हवी कपूर सौंदर्य आणि मादकतेत अव्वल आहे. खुशीही आता तिच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसतेय.

खुशी कपूरने नुकताच एक खास फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये खुशी कपूर एक अतिशय ग्लॅमरस आणि 'विंटेज' (Vintage) लूक मध्ये दिसत आहे.

खुशीने गुलाबी रंगाचा कॉर्सेट टॉप घातला आहे, ज्यावर सुंदर फ्लोरल प्रिंट आहे. सोबत काळ्या जाळीदार पट्ट्या असून ते 'कोक्वेट' फॅशनचे एक उत्तम उदाहरण आहे.

तिने या कॉर्सेट टॉपला साजेशी अशी मॅचिंग फ्लोरल प्रिंटची शॉर्ट्स परिधान केली आहे, ज्यामुळे हा एक स्टायलिश सेट दिसत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फोटोची बॅकग्राउंडही आऊटफिटला मॅच होणारी आहे. भिंतीचा गुलाबी रंग, मागचे कुत्र्याचे पेंटिंग या साऱ्या गोष्टींमुळे फोटोला एक वेगळा आणि 'क्लासी' फील आला आहे..

















