Hrithik Roshanच्या बहिणीला डेट करतोय Kartik Aaryan, जाणून घ्या कोण आहे Pashmina Roshan?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:42 IST2022-11-08T11:51:29+5:302022-11-08T14:42:05+5:30

सारा अली खाननंतर कार्तिक ह्रतिक रोशनच्या बहिणीच्या प्रेमात पडला आहे.

सध्या सर्वत्र कार्तिक आर्यनचा बोलबाला आहे. या अभिनेत्याच्या नावाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कार्तिकच्या 'फ्रेडी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तो खूपच वेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

कार्तिक आर्यनच्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. कार्तिकच्या आयुष्यात सारा अली खाननंतर नवी लेडी लव्ह आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो सध्या पश्मीनला डेट करत आहे. जाणून घेऊया कोण आहे ती?(फोटो इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन पश्मीना अनेकदा एकमेकांच्या घरी जाऊन तासनतास भेटतात. यावरून या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

दोघांचे नाते केवळ मैत्रीपुरते मर्यादित नाही तर ते त्याहुन अधिक आहे. कार्तिक जेव्हा शूट करत नसतो तेव्हा तो पश्मीनासोबत वेळ घालवणं पसंत करतो, अशी चर्चा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीच्या दिवशीही कार्तिकने पश्मीनासोबत जुहूमधील त्याच्या नवीन मॅक्लारेनमध्ये वेळ घालवला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

दोघांच्या जोरदार भेटीगाठी सुरू आहेत आणि दोघेही एकत्र चांगला वेळ घालवत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

पश्मिना ही फिल्ममेकर राजेश रोशन यांची मुलगी आणि अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. (फोटो इन्स्टाग्राम)