ब्लॅक ड्रेसमध्ये बेबोनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, करीना कपूरच्या या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:12 IST2022-04-11T15:12:40+5:302022-04-11T15:12:40+5:30
Kareena Kapoor : करीना कपूर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच करीनाने नवीन फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत ती ब्लॅक रंगाच्या जंपसूटमध्ये पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करीनाने लूक पूर्ण करण्यासाठी हूप इअररिंग्स परिधान केले आहेत. यासोबत स्मोकी आईज आणि न्यूड मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करीना कपूरचा हा फोटो युनायटेड नेशन्स यंग चेंजमेकर्स कॉन्क्लेवमध्ये सहभागी झाली त्यादरम्यानचा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करीनाच्या या फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
करीना कपूर खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)