फिल्मी स्टाइलमध्ये जान्हवी कपूरने केले फोटोसेशन, व्हायरल झाले फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 08:00 IST2021-02-08T08:00:00+5:302021-02-08T08:00:02+5:30

जान्हवी कपूरने नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवी या फोटोंमध्ये खूपच छान दिसत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
जान्हवीने या फोटोसोबत लिहिले आहे की, 'शायद मैं थोड़ी फिल्मी हूं'।
जाह्नवी कपूरच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.
जान्हवीने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली.
जान्हवी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे.
जान्हवीच्या गुंजन सक्सेना या दुसऱ्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
जान्हवीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.