'छोटी गंगुबाई' उर्फ सलोनी दैनीला आता ओळखणं झालं कठीण; तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:12 IST2021-12-17T16:04:02+5:302021-12-17T16:12:28+5:30
Saloni Daini: चिमुरडी गंगुबाई आता २१ वर्षांची झाली आहे.

सिनेइंडस्ट्रीत छोटी गंगुबाई या नावाने प्रसिद्ध असलेली बालकलाकार सलोनी दैनी (Saloni Daini) आता खूपच वेगळी दिसते. आता तिला ओळखणं कठीण झालं आहे.
सलोनी दैनी आता २१ वर्षांची झाली आहे.
सलोनीने गेल्या १४ महिन्यात २२ किलो वजन कमी केले असून ती प्रचंड स्लीम अँड ट्रीम दिसत आहे.
सलोनी प्रचंड ग्लॅमरस झाली असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
सलोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असतो.
सलोनीने २००८ साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेखा त्यावेळी तुफान गाजली होती.
आजही ती गंगूबाई म्हणूनच ओळखले जाते.
त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली', यह जादू है जिन्न का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.