Kat Kristian IPL 2022 GT vs SRH : Splitsvillaची अभिनेत्री वानखेडे स्टेडियमवर आली; तिला पाहून प्रेक्षकांच्या काळजाची धडधड वाढली, Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:39 IST2022-04-28T16:36:22+5:302022-04-28T16:39:16+5:30
IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली.

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली. सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची अवस्था १४ षटकांत ५ बाद १४० झाली होती.
उम्रान मलिकने ( Umran Malik) २५ धावांत ५ विकेट्स घेत गुजरातला हादरवून टाकले होते, परंतु राहुल तेवातिया व राशिद खान ( Rahul Tewatia and Rashid Khan) यांनी अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
तेवातिया २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर, तर राशिद खान ११ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिले. अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावा हव्या असताना या जोडीने २५ धावा कुटल्या.
क्रिकेटच्या मैदानावरील हा थरार पाहून चाहत्यांची धडधड वाढलेली असताना वानखेडे स्टेडियमवर Splitsvillaची अभिनेत्री कॅट क्रिस्टियन ( Kat Kristian) आणि अवंतिका शर्मा ( Avantika Sharma) यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. कॅमेरामनने क्रिकेटचा थरार सुरू असताना प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या या सुंदर अभिनेत्रींना कॅमेरात टिपले.
स्टेडियमच्या मोठ्या स्क्रिनवर व्हायरल झालेल्या या सुंदरी आहेत तरी कोण, याची उत्सुकता चाहत्यांना लागलीच होती. त्यानंतर या दोघी Splitsvill या कार्यक्रमातील अभिनेत्री असल्याचे समोर आले.
कॅट व अवंतिका या अभिनयासह मॉडलिंगही करतात. इंस्टाग्रामवर अवंतिकाचे २.३८ लाख फॉलोअर्स आहेत, तर कॅटच्या फॉलोअर्सची संख्या ही ८ लाखांच्या वर आहे.