महिलांनी आवर्जून पाहावेत असे टॉप ९ सिनेमे, चुकवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:47 IST2025-03-06T16:34:58+5:302025-03-06T16:47:34+5:30

महिलांचे भावविश्व उलगडणाऱ्या अशा सिनेमांची यादी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पाहिलेच पाहिजेत.

८ मार्च रोजी जागतिक महिला दिन (International Women's Day 2025) असतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल' या मर्यादेत पाहिलं जायचं. मात्र, आजच्या काळात केवळ घराचे घरपण जपत नाहीत, तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत. तर यानिमित्ताने महिलांनी (Women Oriented Bollywood Films ) आवर्जून पाहावेत असे टॉप सिनेमे कोणते, यावर एक नजर टाकूया.

या यादीत पहिला सिनेमा आहे तो म्हणजे 'मिसेस' (Mrs). लग्नानंतरची घुसमट, घरातल्या जबाबदाऱ्या आणि हरवलेलं स्वातंत्र्य यावर हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा हा चित्रपट आहे. ZEE5 वर तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल. सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर आहे 'क्विन' (Queen). अभिनेत्री कंगना राणौत हिचा हा चित्रपट आहे. यात ठरलेलं लग्न मोडल्यानंतर एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एकटीच विदेशता आपल्या हनीमूनला जाते. यानंतर तिच्यात कसा बदल होतो, हे सिनेमात पाहायला मिळतं. विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप यांनी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा 'थप्पड' (Taapsi Pannu's Thappad Movie) हा चित्रपट एक उत्तम चित्रपट आहे. एका गृहिणीला भर कार्यक्रमात तिच्या नवरा कानाखाली मारतो. पण, यानंतर ती गृहिणी आपल्या अस्तित्वाची जाणीव संपुर्ण कुटुंबाला करुन देते.

'तरला' (Tarla Movie) हा सिनेमा प्रत्येक गृहिणीने तर पाहिलाच पाहिजे. सामान्य मुलगी ते मास्टर शेफपर्यंतचा संघर्षमय प्रवास या सिनेमात पाहायला मिळतो. पद्मश्री पुरस्कार विजेते शेफ तरला दलाल यांनी लिहिलेलं या सिनेमाचं कथानक हृदयाला स्पर्श करणारं आहे. हुमा कुरैशीने (Huma Qureshi) या सिनेमात मुख्य भुमिकेत आहे. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.

'लापता लेडीज'(Laapataa Ladies) हा विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. यामध्ये अत्यंत सहजतेने समाजातील लैंगिक भेदभाव आणि रुढी परंपरांवर आधारीत एका लहानशा कथानकाद्वारे दोन महिलांचे चरित्र अत्यंत खुबीने मांडले आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

'पिंक' हा चित्रपट प्रत्येक महिलेने पाहावा असा आहे. समाजाची मुर्दाड मानसिकता, बुरसटलेली पुरुषी विचार आणि महिलांकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची त्यांच्या वृत्तीवर हा सिनेमा भाष्य करतो. हा सिनेमा जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.

'दो पत्ती' (Do Patti) या चित्रपटाची कहाणी सौम्या आणि शैली दोन जुळ्या बहिणींची आहे, जी क्रिती सनॉनने साकारली आहे. या सिनेमात काजोल पोलिस आणि वकिल अशा भुमिकेत आहे. घरगुती हिंसाचारावर आधारित हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल.

'पिकू' (Piku) हा चित्रपट वडील-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. नव्वद वर्षांच्या वडिलांना सांभाळणारी पिकू आणि तिच्या प्रेमात पडणारा एक तरुण अशा आशयाचा फॅमिली काॅमेडी ड्रामा या सिनेमात आहे.

'इंग्लिश विंग्लीश' (English Vinglish) हा श्रीदेवी (Sridevi) यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मोठा गाजला होता. या चित्रपटात एक महिला अमेरिकेत इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते. तिच्या कुटुंबात तिला सन्मान मिळवण्यासाठी इंग्रजी शिकण्यास सुरुवात करते. मात्र त्यातही तिला अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यावर मात करत ती इंग्रजी शिकते आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करते.