Miss Universe 2021: कोण आहे हरनाज संधू जिच्यामुळे भारताला २१ वर्षांनी मिळाला Miss Universeचा खिताब; पाहा तिचे रिअल लाइफ ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 10:17 AM2021-12-13T10:17:47+5:302021-12-13T10:22:51+5:30

Miss Universe 2021:जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे यंदा Miss Universe 2021 या वर्षाचा खिताब भारताने पटकावला आहे.

जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे यंदा Miss Universe 2021 या वर्षाचा किताब भारताने पटकावला आहे.

इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे.

इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला.

21 वर्षीय हरनाज मूळ पंजबाची रहिवाशी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता.

सध्या सोशल मीडियावर हरनाजचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये हरनाज नेमकी कोण आहे? कुठून आली ? आणि एकंदरीतच तिची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळेट हरनाज नेमकी कोण आहे ते पाहुयात.

हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या एका शीख कुटुंबात झाला. हरनाजला लहानपणापासून सौंदर्य आणि फिटनेसची आवड आहे.

हरनाज उच्च शिक्षित असून तिने पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

२०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा खिताब जिंकला होता.

२०१८ मध्ये तिला 'मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८'चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला.

मिस इंडिया स्पर्धेत भाग घेणाऱ्या हरनाजने या स्पर्धेत प्रथम टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी ठरली.या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला.

हरनाजपूर्वी सुष्मिता सेन, लारा दत्ता, सेलिना जेटली, नेहा धुपिया यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर सौंदर्याच्या शर्यतीत भारताचे नाव उंचावले आहे.