"तुझं अंतर्वस्त्र दिसलं पाहिजे...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाने केलेली विचित्र मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 20:43 IST2025-03-15T20:36:53+5:302025-03-15T20:43:42+5:30

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांनी त्यांचे कास्टिंग काउचचे अनुभव शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींनी चित्रपटांसाठी केलेल्या लाजिरवाण्या मागण्यांचाही पर्दाफाश केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांनी त्यांचे कास्टिंग काउचचे अनुभव शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींनी चित्रपटांसाठी केलेल्या लाजिरवाण्या मागण्यांचाही पर्दाफाश केला आहे. अशीच एक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्याकडून चित्रपटातील गाण्यासाठी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानंतर तिने शपथ घेतली की ती त्या दिग्दर्शकासोबत कधीही काम करणार नाही. ही अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा.

जी बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली टॅलेंट सिद्ध करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील देसी गर्लने असंख्य चित्रपटांमध्ये काम केले.

एका चित्रपटादरम्यान, एका दिग्दर्शकाने तिच्या स्टायलिस्टला सांगितले होते की, गाण्यात प्रियंका चोप्राची अंतर्वस्त्रे दिसली पाहिजेत. त्यावेळी प्रियंका १९ वर्षांची आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ही मागणी घृणास्पद वाटली आणि तिने चित्रपट सोडला.

प्रियांका चोप्राने फोर्ब्स वुमेन्स समिट दरम्यान दिग्दर्शकाची विचित्र मागणी उघडकीस आणली होती. ती म्हणाली होती की, 'चित्रपटात एक गाणे होते ज्यात मी एस्कॉर्टची भूमिका केली होती कारण सुंदर मुली हेच करतात. मला एस्कॉर्ट बनायचे होते आणि या गाण्यात मला या मुलासाठी आकर्षक व्हायचे होते. मी खूप उत्साहित होते कारण एका मोठ्या भारतीय अभिनेत्यासोबतचा हा माझा पहिला चित्रपट होता आणि हा एस्कॉर्ट पैलू आणि मानवी बाजू समोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक होते.

देसी गर्ल पुढे म्हणाली की, 'मला हे गाणे आठवत आहे आणि मी दिग्दर्शकाशी बोलत होते आणि मी म्हटले की तुम्ही माझ्या स्टायलिस्टशी बोलाल आणि तिला कपड्यांबाबत काय हवे आहे ते समजावून सांगाल का?

प्रियंका म्हणाली की, मी अगदी त्याच्या मागे उभी होती, तो त्याच्या खुर्चीवर खूप हक्काने बसला आहे आणि फोन उचलला आणि म्हणाला, ऐका, जेव्हा ती तिची पेंटी दाखवेल तेव्हा लोक ते पाहण्यासाठी सिनेमा बघायला येतील. त्यामुळे ती खूप लहान असावी, जेणेकरून मला तिची पँटी दिसावी. समोर बसलेल्या लोकांनी तिची पँटी पाहावी आणि असे तो चार वेळा म्हणाला.

प्रियांका चोप्राने यावेळी सांगितले की, तिने या चित्रपटासाठी दोन दिवस शूटिंग केले होते. पण दिग्दर्शकाच्या या मागणीमुळे तिने चित्रपट सोडला आणि स्वत: प्रॉडक्शन कंपनीने केलेला खर्चही दिला.

इतकंच नाही तर त्या दिग्दर्शकासोबत पुन्हा कधीही काम करायचं नाही असंही तिने ठरवलं.

लग्नानंतर प्रियंका परदेशात स्थायिक झाली आहे.