सनाने तुझ्यासह लग्न कसे काय केले ? चाहत्यांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच पती अनसने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:32 IST2020-12-19T14:13:04+5:302020-12-19T14:32:36+5:30
सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे निकाह केल्यानंतर सनाने तिचे सोशल मीडियावर नावदेखील बदलले आहे.

सनाने निकाह झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर आपले नाव बदलून आता सय्यद सना खान असे केले आहे.
सनाचे पती अनस यांनीही आपले इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे.
सना खानने मौलवीशी लग्न केल्यानंतर अनेकांना धक्काच बसला.
इतकी ग्लॅमरस असणारी सनाच्या लग्नावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अनसलाही सनाचे चाहते उलट सुलट प्रश्न विचारताना दिसत आहेत.
यावर अनसने उत्तर देत म्हटले की,सनासह लग्न करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती आणि देवाचा आशिर्वाद बघा माझे लग्न सनासह झाल्याचे सांगितले.
लग्नानंतर इंडस्ट्रीत काम न करणेहा सनाचा निर्णय होता. सनाला माझ्याकडून काम करण्यासाठी पूर्ण परवानगी होती.
अनसचा कटुंब कंस्ट्रक्शन बिजनसमध्ये आहे.
लग्नापूर्वी सनाने सोशल मीडियावर याबद्दल कोणतीही माहिती शेअर केली नव्हती.