बिल गेट्स यांच्या मुलीचं लग्न जमलं हो जमलं, वाचा कोण आहे तो नशीबवान मुलगा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:45 IST2020-02-05T11:24:38+5:302020-02-05T12:45:01+5:30

जेनिफर गेट्स व नायल नस्सार
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांची कन्या जेनिफरने इजिप्शियन अब्जाधीश नायल नस्सारशी लग्न करण्याची घोषणा केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उदयोगपती बिल गेट्सची मुलगी जेनिफर गेट्स हिचा नुकताच साखरपुडा पार पडला
जेनिफरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करुन या साखरपुडाचा खुलासा केला आहे.
नायलने जेनिफरला वेगळ्या अंदाजात बर्फाच्या ठिकाणी नेऊन प्रपोज केले
जेनिफर आणि नायल गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
नायलने पण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिनंदन असा संदेशही लिहिला आहे.
नायलने साखरपुडाचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले आहे की 'तो स्वत: ला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजत आहे'.
हे दोन्ही जोडपे सोशल मीडियावरून त्यांचे पोस्ट टाकून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत
फोटोमध्ये हे कपल खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहेत आणि सोशल मीडियावरून त्या दोघांवर कंमेंट्सचा वर्षाव होत आहे
माझ्या मुलीने घेतलेल्या या निर्णयावर मी आनंदित आहे - बिल गेट्स