वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध गायिकेने केलं बोल्ड फोटोशूट; इंटरनेटवर Photos झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:19 IST2021-12-21T19:13:55+5:302021-12-21T19:19:25+5:30

Christina aguilera: सध्याच्या काळात कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यावर वय हा केवळ आकडा आहे असं वाटतं.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. यात अनेक अभिनेत्री त्यांच्या लाइफस्टाइलसोबतच त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चिल्या जातात.

सध्याच्या काळात कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यावर वय हा केवळ आकडा आहे असं वाटतं.

सध्या सोशल मीडियावर हॉलिवूडच्या एका गायिकेची चर्चा रंगली आहे. या गायिकेने वयाच्या ४१ व्या वर्षी बोल्ड फोटोशूट केलं आहे. मात्र, तिच्या फिटनेसपुढे तिचं वय ४१ असेल असं अजिबात वाटत नाही.

वयाच्या ४१ व्या वाढदिवशी प्रसिद्ध अमेरिकन सिंगर क्रिस्टीना एगुइलेरा (christina aguilera) हिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

क्रिस्टीनाने टॉपलेस फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

क्रिस्टीना तिच्या गाण्यासोबतच अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीही तिने अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये क्रिस्टीनाने हातात ब्लॅक लेदरचं Arm Warmers आणि Prada Gloves घातले आहेत.

क्रिस्टीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो ( फोटो सौजन्य: क्रिस्टीना एगुइलेरा इन्स्टाग्राम पेज)