धक्कादायक! अपहरण केलं, अन्न-पाणी नाही दिलं, खोलीत कोंडलं, मॉडलने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:46 IST2023-01-09T12:12:14+5:302023-01-09T19:46:44+5:30
मॉडलने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंग स्वत: सांगितला आहे. म्हणाली..

स्प्लिट्सविला (Splitsvilla)चा हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत होता. स्प्लिट्सविलाचा हा पहिला सीझन आहे, जो रणविजय सिंग(Rannvijay Singha) होस्ट करत नाहीये. यावेळी शोमध्ये त्याची जागा टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने घेतली आहे. होय, अर्जुन हा सीझन सनी लिओनी (Sunny Leone) सोबत होस्ट करत आहे. दुसऱ्या उर्फी जावेद(Urfi Javed)मुळे हा सीझन खूप चर्चेत होता. आणि आता Splitsvilla 14 एका स्पर्धकाच्या धक्कादायक अनुभवामुळे शो पुन्हा चर्चेत आला आहे. ही स्पर्धक आहे Hiba Trabelssi. जिचा भारतात आल्यानंतर संघर्ष ऐकून सगळ्यांचं डोळे पाणावले. (Photo Instagram)
हिबाला चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे. व्यवसायाने मॉडेल असलेली हिबा अभिनयही करते. तिने एका चित्रपटात कतरिना कैफची बॉडी डबल म्हणून काम केले आहे.(Photo Instagram)
हिबाने नुकतीच स्प्लिट्सव्हिला 14 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि मी मानवी तस्करीचा शिकार झाली आणि तिचं अपहरण झालं होतं. (Photo Instagram)
त्यानंतर तिला एका अंधाऱ्या खोलीत बंद केले होते. त्यानंतर तीन दिवस तिला अन्न किंवा पाणी दिले गेले नाही. यादरम्यान, तिला असं वाटलं की हा आपल्या आयुष्याचा शेवट आहे. (Photo Instagram)
हिबा म्हणाली- 'जेव्हा मी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा मी एका मोठ्या घोटाळ्याची बळी ठरले. तो काळ माझ्यासाठी ब्रेकडाउनचा क्षण होता. (Photo Instagram)
मी मानवी तस्करीचा शिकार झाले होते, ज्याची मला कल्पनाही नव्हती. तो माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ होता, ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला, त्याने माझा विश्वासघात केला. माझी फसवणूक केली. (Photo Instagram)
हिबा पुढे म्हणते- 'हा काळ माझ्यासाठी सर्वात भयानक होता, मला जनावरांसाखे वागवले गेले. माझे अपहरण करून तीन दिवस अन्नपाण्याविना एका खोलीत कोंडून ठेवले. (Photo Instagram)
पण, मी हार मानली नाही. प्रयत्न केला आणि त्या यातून बाहेर पडले. त्या घटनेने मी घाबरले. पण, धीर सोडला नाही. माझ्या मनावर आणि शरीरावर त्याचा परिणाम झाला, पण तरीही मी पुन्हा उभे राहिले. (Photo Instagram)
स्प्लिट्सव्हिलामध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा गॉडफादरशिवाय काम मिळणे खूप कठीण होते. मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे आणि पुढे जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे की एक दिवस मला नक्कीच यश मिळेल.(Photo Instagram)