'रंग माझा वेगळा'मधील श्वेताच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:29 IST2022-06-02T16:13:08+5:302022-06-02T16:29:13+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरेने प्रेक्षकांच्या मनात छाप उमटवली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात पोहचली.
या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.
फार कमी लोकांना माहित असेल की, अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे.
नुकताच अनघा भगरे हिने पहिल्यांदाच आईचा फोटो शेअर केला आहे. तिची आई खूपच साधी आहे.
अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले.
'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.
अनघाने नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली.
'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते.
याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता.
अनघा भगरे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
अनघाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.