पाकिस्तानची 'प्रिती झिंटा' म्हणून ओळखली जाते 'ही' अभिनेत्री, पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड डेब्यूचं स्वप्न भंगलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:41 IST2026-02-15T14:01:58+5:302026-02-15T14:41:12+5:30
कोण आहे ती? भारतात आहे तिची प्रचंड क्रेझ

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रिती तिच्या गालावरच्या खळीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते.

पण, ती एकमेव नाही बरं का? जिच्या गालावरच्या खळीवर लाखो तरुण मरतात. एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, जिला पाकिस्तानची 'प्रिती झिंटा' म्हणून ओळखलं जातं.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सौंदर्याची खाण असलेली हानिया आमिर (Hania Aamir) आहे. प्रिती झिंटा आणि हानिया आमिरमध्ये बरंच साम्य असल्याचं चाहत्याचं मत आहे.

विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. भारतात तिची खूप क्रेझ आहे.

हानियाचे 'मेरे हमसफर', 'दिल रुबा', 'मुझे प्यार हुआ था', 'इश्किया', 'कभी मैं कभी तुम' या शोला भारतातही प्रचंड पसंती मिळाली आहे.

हानियाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न होते. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ याच्या 'सरदारजी ३' मधून ती भारतीय इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार होती. पण, तिचं ते स्वप्न अपुर्ण राहिलं.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे तिचा 'सरदारजी ३ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही.

सध्या हानियाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटही भारतात उपलब्ध नाही, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचा तिच्याशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.

हानिया आमिरचे नाव गेल्या काही काळापासून भारतीय रॅपर बादशाहशी जोडले जात आहे. दुबईमध्ये या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.

बादशाहने यावर मौन सोडताना सांगितले की, "आम्ही फक्त चांगले मित्र आहोत".दुसरीकडे हानियाने बादशाहला 'रॉकस्टार' म्हणत त्यांच्यातील मैत्रीवर भाष्य केले आहे.

















