Ankita Lokhande PICS : हॅलोवीन पार्टी अन् अंकिता लोखंडेचं सिजलिंग फोटोशूट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:21 IST2022-11-02T11:16:50+5:302022-11-02T11:21:39+5:30
Ankita Lokhande : सोमवारी अंकिताने तिच्या घरी हॅलोवीन पार्टी आयोजित केली होती. यावेळी अंकिताचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या स्टायलिश लुकने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
सोमवारी अंकिताने तिच्या घरी हॅलोवीन पार्टी आयोजित केली होती. यावेळी अंकिताचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
हॅलोवीन पार्टी लुकचे काही फोटो अंकिताने शेअर केले आहेत. या फोटोत अंकिता व्हाईट-गोल्ड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसतेय.
आत्तापर्यंत सर्वात बेस्ट लुक, मला आवडला, असं लिहित अंकिताने इन्स्टाग्रामवर या लुकचे फोटो शेअर केले आहेत.
काहींना अंकिताचा हा लुक जाम आवडला. पण अनेकांनी अंकिताला या अवतारात पाहून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
साडीत छान दिसतेस, यात बकवास दिसत आहेत. प्लीज पुन्हा असं काही ट्राय करू नकोस, अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या.
नुकतीच अंकिताने लग्नानंतरची पहिली दिवाळी ती साजरी केली. यावेळी अंकिताने सासरच्या घरच्या दिवाळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
अंकिताच्या सासरचं घर म्हणजे जणू महाल आहे. हे घर इतकं अलिशान आहे की, त्यापुढे सलमान, शाहरूखचं घरही फिकं वाटावं. अंकिताच्या या घराची चांगलीच चर्चा रंगली होती.
अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे.