ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:29 IST2025-12-09T14:05:14+5:302025-12-09T14:29:25+5:30
साडी वापरून परत देणार होती गिरिजा, अभिनेत्रीनं केला खुलासा

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

गिरीजा ओकचं सौंदर्य साडीमध्ये आणखी बहरतं. गिरीजा ज्या पद्धतीनं साडी कॅरी करते. त्याची बातच काही और असते.

रातोरात नॅशनल क्रश झालेली गिरिजा तिच्या साडीतल्या लुकमुळं सोशल मीडियावर स्टार ठरली. गिरिजानं द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला.

या साडीमुळे गिरीजाला एक नवी ओळख मिळाली, अनेक ठिकाणी तिचे कौतुक झाले. पण आता गिरीजाने या व्हायरल साडीमागचे एक खास गुपित उघड केले आहे.

पण, तुम्हाला माहितेय का ती निळी साडी गिरिजाची नव्हतीच. गिरीजाने हटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचा खुलासा केलाय.

गिरीजाने खुलासा केला की, ही निळी साडी तिला मराठी अभिनेत्री आणि तिची अत्यंत जवळची मैत्रीण प्रिया बापट हिच्या ब्रँडकडून आली होती. प्रिया आणि तिची बहीण श्वेता यांच्या 'SaiVenchi' या ब्रँडची ती साडी होती.

गिरीजाला शूटसाठी खास साड्यांची गरज होती. तिने प्रियाला संपर्क साधला आणि 'मी साडी वापरून परत देईन आणि आपण कोलाब्रेशन करुन पोस्ट करू' असे सांगितले.

प्रियाची बहीण श्वेता हिने गिरीजाला अनेक साड्या पाठवल्या होत्या. त्यापैकी ही स्काय ब्लू रंगाची लिनन साडीतील गिरिजा चाहत्यांना पसंत पडली.

या साडीबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, "आम्ही अजिबात विचार केला नव्हता की ही साडी इतकी व्हायरल होईल. मी त्यांच्या इतरही साड्या अनेकदा नेसल्या होत्या, पण हीच साडी लोकांच्या इतकी लक्षात राहील असं वाटलं नव्हतं".

गिरीजा ओकने खुलासा केला की, ही साडी विकत घेतली नसली तरी तिचं साडीशी एक खास नातं तयार झालं होतं. त्यामुळे तिने श्वेताला (प्रिया बापटची बहीण) ही साडी काही काळ आपल्याकडेच ठेवण्याबद्दल विचारणा केली. त्यावर श्वेताने आनंदित होऊन ती साडी गिरीजाला भेट म्हणून दिली.

गिरिजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ओक लवकरच थेरपी शेरपी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

















