रब ने बना दी जोडी, राहुल वैद्य दिशा परमारचं पार पडलं शुभमंगल, पाहा Inside Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 16:04 IST2021-07-16T15:31:12+5:302021-07-16T16:04:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कपल राहुल वैद्य आणि दिशा परमार अखेर रेशीमगाठीत अडकले आहेत. चाहत्यांनाही अत्यंत आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात.

पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे काही नवीन फोटोज् समोर आले आहेत.

लग्नातही राहुल आणि दिशा दोघांचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये नववधू दिशा परमारचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती समोर आलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

बिग बॉस शोमध्येही पहिल्यांदा राहुल वैद्यने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

तेव्हा पासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा प्रचंड रंगायच्या.चाहतेही या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते.

अखेर आज तो दिवस उजाडला आणि दोघेही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

राहुल आणि दिशा दोघांच्याही लग्नातला लूक आकर्षणाचा विषय ठरत आहे.

लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये दिशाच्या लूकला चारचाँद लागले होते.

राहुल आणि दिशाच्या लग्नाच्या फोटोंवर नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा चाहते देताना दिसत आहे.

















