PICS : फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या पार्टीचे खास फोटो, बघा कुणी-कुणी लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:04 IST2022-02-25T11:49:22+5:302022-02-25T12:04:20+5:30
Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding Party : फरहान अख्तर व शिबानी दांडेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नाचं सेलिब्रेशन मात्र अद्याप संपलेलं नाही...

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नाचं सेलिब्रेशन मात्र अद्याप संपलेलं नाही.
होय, काल रात्री बॉलिवूडचे दिग्गज निर्माते रितेश सिधवानी यांनी नवदांम्पत्यासाठी खास ग्रँड पार्टी ठेवली.
या पार्टीला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली. अगदी करिना कपूर, दीपिका पादुकोणपासून अनन्या पांडे, सुहाना खान, आर्यन खान असे सगळे या पार्टीला दिसले.
फरहान व शिबानी या पार्टीचे स्टार होते. यावेळी शिबानी हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली. तर फरहान नेहमीप्रमाणे कॅज्युअल लुकमध्ये दिसला.
शिबानी दांडेकरचा लुक सगळ्यांपेक्षा न्यारा होता. कॅमेऱ्यासमोर तिने अशी झक्कास पोझ दिली.
दीपिकाने ब्लॅक कलरचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. स्टायलिश लुकमध्ये तिने पार्टीला हजेरी लावली.
करिना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या चार BFFनी पार्टीला एकत्र हजेरी लावली. चौघींनीही एकत्र पोझ दिल्यात.
रितेश देशमुख व जेनेलिया डिसूजा हेही या पार्टीला हजर होते. यावेळी जेनेलियाच्या सिंपल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
शाहरूख खान या पार्टीला हजर नव्हता. पण गौरी खान, आर्यन आणि सुहाना यांनी या पार्टीला आवर्जुन हजेरी लावली.
ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान पहिल्यांदा कोणत्या पार्टीत दिसला.
अनन्या पांडे हिनेही अशा स्टायलिश लुकमध्ये पार्टीला हजेरी लावली.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी हेही पार्टीला हजर होते.
तारा सुतारिया तिचा बॉयफ्रेन्ड आदर जैनसोबत पार्टीत पोहोचली. कपलने कॅमेऱ्याला एकत्र पोझ दिली.
अर्जुन रामपाल आपल्या पार्टनरसोबत पार्टीला आला होता.